Bhosari : घरफोडी करून एक लाखांची रोकड लंपास

एमपीसी न्यूज – घराचे कुलूप उघडून घरातून एक लाख रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना बुधवारी (दि. २९) रात्री साडेआठच्या सुमारास कासारवाडी येथे घडली.

रुपेश ज्ञानेश्वर घुंबरे (वय 26, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दिलीप यादव (रा. मुंबई) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश यांचे कासारवाडी येथे मराठा खानावळ नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या कामासाठी आणि कामगारांच्या पगारासाठी रुपेश यांच्या मेहुण्यांनी एक लाख रुपये दिले होते. ही रक्कम रुपेश यांनी घरी ठेवली.

बुधवारी रात्री साडेआठच्या सुमारास दिलीप याने रुपेश यांचे मित्र सचिन काळे यांच्याकडून घराची चावी घेतली. घर उघडून घरात ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड दिलीप याने चोरून नेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.