Bhosari Crime: पळून जाणाऱ्या चोरांना पाठलाग करून केले अटक

एमपीसी न्यूज : एमआयडीसी भोसरी पोलिसांनी पाच चोरांना अवघ्या काही तासातच पाठलाग करत अटक केली आहे. (Bhosari Crime) एखाद्या चित्रपटाच्या कथानका प्रमाणे मंगळवारी (दि.2) मध्यरात्री टेल्को रोडवर हा थरार सुरु होता.

 

अफजल युसुफ मनियार (वय.24 रा. कुदळवाडी), सलमान इसराद मनियार (वय.23 रा.खेड),तौकीर रशीद खान (वय.24),हिमांशू राम सुमेर,सिंग (वय 19), सुकेश मुन्नुलाल गौंड (वय 19) तीघेही राहणार कुदळवाडी अशी अटक आरोपींची नावे असून आसीफ सईद रिजवी (वय.48 रा.पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या असीआ प्रोफाईल इंडस्ट्रीज नावाचे टेल्को रोडला शॉप आहे.त्यांच्या शॉपजवळील रिकाम्या जागी 90 हजार रुपयांच्या मोठ्या लोखंडी मेटल शीट ठेवल्या होत्या.याच मेटल शीट चोरटे छोटा हत्ती या टेम्पोत टाकत होते. यावेळी फिर्यादी यांच्या शॉपच्या शेजारच्या नागरिकांनी तेथे चोरी होत असल्याची खबर फिर्यादी यांना दिली. फिर्यादी हे घटनास्थळी पोहचले असता त्यांची व चोरट्यांची तेथे झटापट झाली.

 

MIssing Girl Murder: कोथुर्णे प्रकरणी एकाला अटक, अवघ्या 24 तासात छडा लावण्यात पोलिसांना यश

 

दरम्यान पोलिसांनाही याची खबर देण्यात आली. तीन चोरटे दुचाकीवरून पळून जात असताना फिर्यादी यांनी चोरट्यांचा पाठलाग केला.तेवढ्यात परिसरात गस्त घालणारे पोलीस ही तेथे आले व त्यांनीही चोरट्यांचा पाठलाग केला.यावेळी चोरटे ज्या दुचाकीवरून पळून जात होते ती दुचाकी घसरली. तेथे फिर्यादी आधी पोहोचले असता चोरट्यांनी त्याची नंबर प्लेट नसलेली दुचाकी सोडून त्यांनी फिर्यादीशी धक्काबुक्की करत फिर्यादीची गाडी घेऊन ते पळून गेले. मात्र पोलिसांनी त्यांचा माग काढत पाचही चोरट्यांना अटक केली आहे. यामध्ये दिड लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.