Bhosari : ऍसिड टाकण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज- तोंडावर ऍसिड टाकण्याची धमकी देत रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी गुरुवारी (दि .18) भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

जोसेफ ऍंथोनी देवनेसन (वय 40, रा. फुलेनगर, दापोडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडितेच्या 42 वर्षीय आईने फिर्याद दिली आहे.

आरोपी देवनेसन हा पीडित 16 वर्षीय मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न करीत असे. तसेच ही बाब कोणाला सांगितली तर तोंडावर ऍसिड फेकून चेहरा विद्रुप करेल अशी धमकी दिली. त्यानंतर वारंवार तिचा पाठलाग करीत असे. पीडितेने हा प्रकार आईला सांगितला असता त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीला अटक केली असून भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.