Bhosari News: सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून 15 सिलिंडर चोरीला

Bhosari News: 15 cylinders stolen from a cylinder transport tempo फिर्यादी शिवकरण यांच्या गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर दापोडी येथील एक कामगार काम करतो

एमपीसी न्यूज – सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पो मधून एका चोरट्याने पंधरा गॅस सिलिंडर आणि एक टाटा कंपनीची बॅटरी असा 81 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना रविवारी (दि.16) सकाळी दापोडी येथे उघडकीस आली.

शिवकरण लक्ष्मण विटकर (वय 27, रा. रामनगर, वाघोली) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजाराम तेजाराम खावो (वय 38, रा. पवनानगर, जुनी सांगवी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शिवकरण यांच्या गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर दापोडी येथील एक कामगार काम करतो. शनिवारी (दि.15) रात्री सात वाजता कामगाराने सिलिंडरने भरलेला टेम्पो त्याच्या घरासमोर दापोडी येथे पार्क केला.

रात्री आरोपी राजाराम याने टेम्पोचा मागील बाजूचा दरवाजा तोडून टेम्पो मधून 15 गॅस सिलिंडर आणि एक टाटा कंपनीची बॅटरी असा एकूण 81 हजार 700 रुपयांचा ऐवज चोरून नेला. भोसरी पोलिसांनी आरोपी राजाराम याला अटक केली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.