Bhosari : संत निरंकारी मिशनद्वारा भोसरीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज – भोसरी येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनद्वारा (Bhosari) विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन संत निरंकारी सत्संग भवन, भोसरी या ठिकाणी रविवार दि. 24 डिसेंबर  रोजी सकाळी 9 ते 5 या वेळेत करण्यात आले आहे.

मिशनच्या स्वयंसेवकांद्वारे भोसरी आणि  दिघी परिसरात घराघरामध्ये जाऊन तसेच दत्तगड पायथा,मॅगझीन चौक, भोसरी चौक, स्पाईन सर्कल अशा अनेक गर्दीच्या ठिकाणी जाऊन नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले. संत निरंकारी मिशनद्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात.

Maval : मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. आपण मानव आहोत तर रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे.

रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो. ‘रक्तदान श्रेष्ठदान’ या उक्तीप्रमाणे आपण सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन भोसरी चे संयोजक अंगद जाधव यांनी केले (Bhosari) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.