Bhosari : नागरी समस्या सोडवा अन्यथा उपोषण करण्याचा नगरसेविकेचा इशारा

एमपीसी  न्यूज – भोसरीतील सनस्कीस्ट अपार्टमेंटमध्ये रहिवाशांना मुलभूत सुविधा सनस्कीस्टच्या मालकांनी पुरविल्या नाहीत. गेल्या अनेक महिन्यांपासून येथील रहिवाशी विविध समस्यांनी त्रस्त आहे. तरी या सनस्कीस्टमधील रहिवाशांचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी मागणी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर, बांधकाम विभाग यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे केली आहे. नागरिकांना त्यांच्या नागरी सुविधा एक महिन्याच्या आत पुरविल्या नाही,  तर स्वत: रहिवाशांना बरोबर घेऊन उपोषणाला बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.

दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, सनस्कीस्ट अपार्टमेंटमधील रहिवाशांनी बिल्डरक़डून कोणतेही सहकार्य मिळत नसल्याची तक्रार नगरसेविका प्रियंका बारसे यांच्याकडे केली. त्यानंतर स्वत: नगरसेविका बारसे यांनी सनस्कीस्ट अपार्टमेंटमधील पाहणी केली. तर रहिवाशांना सहन न होण्याइतपत अपार्टमेंटमध्ये त्रास आहे. पार्किंगमध्ये साठलेले पाणी, चालू नसलेली लिफ्ट, पिण्याच्या पाण्याची आरसीसी टाकी नाही, जिन्यांमध्ये वीज नाही. बांधकामांचे साहित्य अजुनही पडून राहिले आहे. तीन वर्षापूर्वीची बिल्डिंग असून तेथील लोकांना कोणत्याही प्रकारचा ताबा नाही. सोसायटीची नोंद नाही. नागरिकांना त्यांच्या नागरी सुविधा एक महिन्याच्या आत पुरविल्या नाही तर स्वत: रहिवाशांना बरोबर घेऊन उपोषणाला बसण्याचा त्यांनी इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.