Bhosari : पाण्याच्या हौदात बुडून दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

एमपीसी न्यूज – घराजवळ खेळताना पाण्याच्या हौदात बुडून दोन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना भोसरी येथे घडली. वेदिका राजू मुळूक (वय 2) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू मुळूक पूर्वी भोसरी येथे भाड्याच्या घरात राहत होते. त्या घर मालकाच्या मुलाचा विवाह गुरुवारी आहे. त्या विवाह सोहळ्यासाठी राजू मुळूक, त्यांच्या पत्नी, आणि दोन मुले हे कुटुंब भोसरीत आले होते. बुधवारी घराजवळ वेदिका खेळत होती. घराच्या मागच्या बाजूला जमिनीच्या लगत पाण्याचा हौद आहे.

वेदिका खेळत खेळत पाण्याच्या हौदाजवळ गेली. अचानक ती पाण्यात पडली. बराच वेळ वेदिका दिसत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध सुरु केला. परिसरात सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर वेदिका हौदात पडल्याचा संशय तिच्या घरच्यांना आला. त्यामुळे सर्वांनी हौदात पाहिले असता वेदिका हौदात पडली होती.

वेदिकाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे विवाह सोहळ्यावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III