Bhosari News : भोसरीत चार हजार किलोग्राम स्टीलची चोरी करून विकल्या प्रकरणी तीन जणांना अटक

एमपीसी न्यूज : भोसरी येथील वर्कशॉप (Bhosari News) मधून 7.60 लाख रुपये किंमतीच्या चार हजार किलोग्राम स्टीलची चोरी करून विकल्या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत महेश शहू, वय 33 वर्षे, रा. लांडेवाडी भोसरी, मुळगाव राजीम नगर यांनी बुधवार 16 नोव्हेंबर रोजी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अजय कुमार सरोज वय 20 वर्षे राहणार रा. शांतीनगर, लांडे तालीम जवळ भोसरी, पुणे, करणसिंग राजपूत, वय 19 वर्षे, रा. गुळवे वस्ती भोसरी, पुणे व हिम्मत सिंग राजपूत, वय 33 वर्षे, रा. बोऱ्हाडे वस्ती, मोशी, पुणे या तीन जणांना अटक करण्यात आले आहे.

Seva Sarthi : सेवा सारथीच्या गड किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

अरबी अजय कुमार सरोज व करण सिंग राजपूत यांनी फिर्यादी यांच्या हरी ओम मशीन टूल्स, साम्राज्य इंडस्ट्रीयल इस्टेट, गुळवे वस्ती, भोसरी या वर्कशॉप मधून 7.60 लाख रुपये किंमतीचे (Bhosari News) एकूण 4000 किलोग्राम स्टीलची चोरी करून आरोपी हिंमतसिंग राजपूत यांच्या भंगाराच्या दुकानावर गुळवे वस्ती, भोसरी येथे नेऊन 190 रुपये किलोने विक्री केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.