Bhosari News : भोसरी, चिंचवडमध्ये जीवे मारण्याची धमकी देत दोन महिलांचा विनयभंग

एमपीसी न्यूज – भोसरी येथे महिलेला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देत महिलेचा विनयभंग केला. तर चिंचवड येथे महिलेशी जवळीक साधून तिला जीवे मारण्याची धमकी देत तिचा विनयभंग केला. याप्रकरणी रविवारी (दि. 21) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

भोसरी पोलीस ठाण्यात अनिकेत हिरालाल पेडगावकर (वय 31, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि. 19) रात्री फिर्यादी महिला त्यांच्या घरी पायी चालत जात होत्या. त्यांच्या मागून आरोपी आला. महिलेसोबत त्याने गैरवर्तन केले. महिलेने भावाला बोलावण्याची धमकी दिली असता आरोपीने महिलेला आणि तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्याशी गैरवर्तन करत विनयभंग केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

चिंचवड पोलीस ठाण्यात नागेश मधुकर राठोड (वय 21, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जून 2021 पासून 21 नोव्हेंबर या कालावधीत आरोपीने फिर्यादी महिलेच्या घरी जाऊन फिर्यादीशी जवळीक करून तिचा विनयभंग केला. महिलेला शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.