Bitcoin trading Fraud : बिटकॉइनच्या आमिषाने तब्बल साडे तेरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज  – बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये (Bitcoin trading Fraud) नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची तब्बल साडे तेरा लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना 8 एप्रिल ते 3 मे या कालावधीत यमुनानगर, निगडी येथे घडली.

राकेश ईश्वरदास लोहार (वय 38, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 85246388272, 85251360684, 85266707297 हे मोबाईल धारक आणि buycoin हे अॅप्लिकेशन बनवणा-या अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना संपर्क करून बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देतो असे सांगून व्हाटसअपवर एक लिंक पाठवली. त्यात फिर्यादी यांना वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना buycoin हे अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. त्या अॅपवर झालेला नफा काढण्यासाठी वेळोवेळी पैसे भरण्यास सांगून 13 लाख 67 हजार रुपयांची (Bitcoin trading Fraud) फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

Pimpri Corona Update: रुग्णसंख्या घटली! शहरात आज 29 नवीन रुग्णांची नोंद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.