Pune news: शिक्षण क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही कव्हेकरांनी यशस्वी वाटचाल करावी : आ. चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज:    १९८३ मध्ये जे.एस.पी.एम. संस्थेचे स्थापना करण्यात आली १० वर्षांत पुण्यातही या शैक्षणिक वाटचालीचा बोलबाला झाला. एका युनिटचे भूमिपूजन तर एका युनिटच्या इमारतीचे उदघाट्न करण्यात आले. या संस्थेच्या ३२ युनिटच्या माध्यमातून संस्थची यशश्वी वाटचाल सुरु आहे.

शैक्षणिक क्षेत्राबरोबरच भाजपा नेते तथा  माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शना खाली प्रतिभाताई पाटील कव्हेकर, मुलगा अजितसिंह पाटील कव्हेकर यांची राजकीय वाटचालही सुरु आहे. परंतु या पुढील कालावधीत शिक्षण क्षेत्राबरोबरच राजकीय क्षेत्रातही कव्हेकर परिवाराने यशस्वीपणे वाटचाल करावी त्यांच्या राजकीय वाटचालीला माझ्या सदैव शुभेच्छा आहेत असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री तथा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

यावेळी ते जे. एस. पी. एम. संस्थेअंतर्गत येणाऱ्या अराईज इंटरनॅशनल स्कुल भोसरी येथील इमारतीच्या उदघाट्न प्रसंगी ते बोलत होते.  या कार्यक्रमाला माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन, माजी मंत्री तथा आमदार संभाजीराव पाटील, चिंचवड मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार विलासराव लांडे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषाताई ढोरे,जे. एस. पी. एम.चे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, लातुर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, जे.एस.पी.एम. चे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर,आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच जे.एस.पी.एम.चे कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील कव्हेकर, समन्वयक संचालक निळकंठराव पवार, संभाजीराव पाटील, बापूसाहेब गोरे, विनोद जाधव, अराईज इंटरनॅशनल स्कुल, भोसरीचे प्राचार्य जितेंद्र खैरनार, स्वामी विवेकानंद नॅशनल स्कुल  रहाटणीच्या प्राचार्य उर्मिला शर्मा, बँकेचे संचालक एस.आर.मोरे, सूर्यकांतराव शेळके, एसटी महामंडळाचे माजी व्यवस्थापक डी.टी. जाधव, उद्योजक राठोड, अ‍ॅड गोजरे, अ‍ॅड थंबा, गटनेते नामदेव डाके, नगरसेवक अरुण पवार, जयश्रीताई सूर्यवंशी, माधवी राजपुरे, गोरखनाथ झोळ, चंद्रकांता ताई सोनकांबळे, महाराज गजानन व्हाव्हळकर, बालाजी पांचाळ, अ‍ॅड सतीश गोरठे, आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री तथा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, शिक्षणासारखे दुसरे सत्कार्य नाही शिक्षणामुळे संस्काराने आणि संस्कृतची जाणीव होते त्यामुळे शिक्षण क्षेत्रात लातूरच्या धर्तीवर पुण्यात हि योगदान द्यावे. कव्हेकर साहेबांची ओळख हि विलासरावांना पराभूत करणारे व्यक्तीमत्व म्हणूनच झालेली आहे. त्यामुळे यापुढील कालावधीत राजकारणामध्ये सक्रिय रहावे असे आव्हानही त्यांनी यावेळी बोलताना केले.

लातूरच्या धर्तीवर जळगावातही शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करावा: माजी मंत्री गिरीश महाजन

१९९३ ला झालेल्या किल्लारी भूकंपाच्या वेळी त्यांची आणि माझी भेट झाली. मी सामाजिक कार्यासाठी आलो होतो तर कव्हेकर हे स्थानिक नेते म्हणून किल्लारीला मदतीसाठी आले होते, त्यानंतर १९९५ मध्ये विलासरावांना पराभूत करून ते निवडून आलेत व मीही आमदार म्हणून निवडून आलो दोघानींनी ५ वर्ष सभागृहात सोबत काम केले. त्यांनी यानंतर राजकीय वाटचालीबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप प्रगती केली तर मी सहाव्या टर्ममध्ये आमदार म्हणून कार्यरत आहे. मध्य प्रदेशाची पोट निवडणूक असतानाही फक्त त्यांच्या प्रेमापोटी मी इथे आलो आहे .

त्यामुळे मराठवाड्यातील लातूरसारख्या शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करणाऱ्या जिल्ह्यातून पुण्यापर्यंत  वाटचाल केली आहे . त्यामुळे लातूरच्या धर्तीवर जलगावातही  जे.एस.पी.एम.ची वाटचाल सुरु करावी त्यासाठी आम्ही जागा देऊ, तुम्ही फक्त इमारतीचा खर्च करावा अशी शैक्षणिक ऑफरही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

२१ व्या शतकात मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जगाचे नेतृत्व करील  – माजी आ. कव्हेकर

पुणे ही महाराष्ट्रातील शिक्षणाची पंढरी आहे. त्यामुळे जे.एस.पी.एम. संस्थेच्या माध्यमातून अराईज इंटरनॅशनल स्कुल, रावेत  व अराईज इंटरनॅशनल स्कुल, भोसरी या दोन युनिटची सुरुवात करण्यात आली. तर स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुलची सुरूवात गेल्या दहा वर्षांपूर्वी केली असून या माध्यमातून अध्यात्म, विज्ञान व व्यावसायिकतेवर आधारित विध्यार्थी घारडविण्याचे काम सुरु केलेले आहे.

तसेच महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून मराठवाड्यात पाच शाखेच्या माध्यमातून काम सुरु आहे. तसेच आर्षयोग प्रतिष्ठानच्या माध्यमातून योग व अध्यात्माचे काम केले जात आहे. २० व्या शतकात उद्योग बँकिंगमध्ये खूप बदल झालेले आहे. नॅनो टेक्नोलोंजि व रोबोटच्या माध्यमातून काम केले जात आहे . तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून सी.बी.सी.ई . शिक्षणपद्धती आणली असून मानवता हाच धर्म व टॅलेंट हीच जात समजून विद्यार्थाना घडविण्याचे काम केले जात आहे.

२०२४ पर्यंत देशाचे उत्पन्न वाढणार असून देशाचा जेडीपी ५ ट्रिलियन डॉलरवर आणण्याचा आपला  प्रयत्न आहे. त्यामुळे भविष्यात या प्रगतीच्या जोरावर २१व्या भारत जगाचे नेतृत्व करेल व स्वामी विवेकानंदानी केलेली भविष्यवाणी खरी ठरेल असा विश्वास जे.एस.पी.एम संस्थेचे संस्थापक तथा माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी बोलताना व्यक्त केला.

तसे माजी कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जे.एस.पी.एम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अराईज इंटरनॅशनल स्कुल, रावेत येथील इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अब्दुल गालिब शेख यांनी केले तर आभार प्राचार्य जितेंद्र खैरनार यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.