Maval Crime News : नेपाळला पोहोच करायच्या दोन जेसीबी मशीनचा अपहार, 88 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – नवलाख उंबरे, मावळ येथून नेपाळला पोहोच करायच्या दोन जेसीबी मशीनचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 88 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी ट्रान्सपोर्ट कंपनीचा मालक आणि जेसीबी घेऊन जाणा-या ट्रेलरचा चालक यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

13 फेब्रुवारी 2021 रोजी नवलाख उंबरे, मावळ येथे हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी अंकुश किसन तुमकर (वय 37, रा. वडगाव मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार रवी ट्रान्सपोर्ट सर्विसेस, जमशेदपूरचे मालक मनजितसिंग आणि ट्रेलरचा चालक यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एम एस डब्ल्यु अर्थ मुव्हर्स, नेपाळ या कंपनीत काम करतात. कंपनीने खरेदी केलेले दोन जेसीबी मशीन नवलाख उंबरे, मावळ येथून नेपाळला पोहोच करायचे होते. पण, दोन्ही मशीन नेपाळला पोहोच न करता त्याचा अपहार करून 88 लाखांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.