Pune News : बीएमसीसी’ने पटकावला यंदाचा पुरुषोत्तम करंडक

एमपीसी न्यूज : यंदाचा पुरूषोत्तम करंडक बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) संघाने पटकावला. बीएमसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘मंजम्मा पूराणम’ या एकांकीने पुरुषोत्तम करंडक पटकावला. तर अहमदनगरच्या पेमराज सारडा महाविद्यालयाच्या संघाच्या ‘सहल’ या एकांकिकेने द्वितीय क्रमांक मिळवला. 

तर गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या ‘भाग धन्नो भाग’ एकांकीकेला तृतीय क्रमांकाचा संजीव करंडक पुरस्कार मिळाला आहे. श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संघाची ‘एवरी नाईट इन माय ड्रीम’ ही एकांकिका जयराम हर्डीकर सर्वोत्कृष्ट प्रयोगिक एकांकिका ठरली.

भरत नाट्य मंदिरात रविवारी रात्री या स्पर्धेचे निकाल जाहीर होणार असल्याने महाविद्यालयीन तरूणांची या परिसरात गर्दी जमली होती. निकाल जाहीर होताच अरे आवाज कुणाचा… या जयघोषात बृहन्महाराष्ट्र महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.