Talegaon Dabhade News : लिंब फाटा येथे उड्डाण पूल बांधा, नगरसेवक अरूण माने यांची मागणी

एमपीसी न्यूज : तळेगावचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या लिंब फाटा येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग 4 वर उड्डाण पूल बांधण्यात यावा, वाहतूक नियंत्रक दिवे बसवावेत तसेच गतिरोधक तयार करावेत, अन्यथा  गुरूवार (दि 15) रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा इशारा नगरसेवक अरूण माने यांनी राज्य रस्ते विकास महामंडळ पुण्याचे कार्यकारी अभियंता यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

माने यांनी निवेदनात म्हटले आहे की, तळेगांव दाभाडे मुंबई पुणे NH4 लिंब फाटा या ठिकाणी वारंवार लहान मोठे अपघात झाले आहेत. या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना  जीव गमवावा लागला  आहे. याबाबत संबंधित विभागाला अनेकदा निवेदनाद्वारे सूचना करून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

नागरिकांची गैरसोय दुर करण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी या ठिकाणी उड्डाण पूल बांधणे, अन्यथा सिग्नल यंत्रना बसवावी. अथवा स्पिड ब्रेकर टाकावे. हायमास्ट दिवे बसविणे गरजेचे आहे.

याबाबत विभागाकडून लवकरात लवकर कार्यवाही व्हावी, अन्यथा गुरूवार दि  15 जुलै रोजी लोकशाही मार्गाने  रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा अरूण माने यांनी दिला आहे.

याबाबतच्या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार आदींना दिल्याचा उल्लेखही निवेदनात केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.