Pimple saudagar News : ट्रॅव्हलरच्या धडकेत बुलेटचे नुकसान

एमपीसी न्यूज – रायडर मेनिया या कार्यक्रमासाठी गोव्याला निघालेल्या बुलेटस्वाराच्या बुलेटचा पिंपळे सौदागर मधील कुंजीर चौकात अपघात झाला. (Pimple saudagar News) यात बुलेटचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी सव्वासहा वाजता घडली.

प्रतीक शशिकांत मटकर (वय 40, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनुरथ भास्कर वाघ (वय 46, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nigdi News : जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा निगडी येथे संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मटकर हे रायडर मोनिया या कार्यक्रमासाठी गोव्याला जात होते. ते पिंपळे सौदागर येथील कुंजीर चौकात आले असता (Pimple saudagar News) त्यांच्या बुलेटला पाठीमागून टेम्पो ट्रॅव्हलरने जोरात धडक दिली. त्यात बुलेटचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी ट्रॅव्हलर चालकाला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.