Bye Elections : पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात  – राज ठाकरे

एमपीसी न्यूज –  दोन आमदारांच्या निधनानंतर पुणे व पिंपरी-चिंचवड येथे पोटनिवडणुका येवू घातल्याा आहेत. मात्र जेंव्हा एखाद्या लोकप्रतिनीधी चे निधन होते तेव्हा तिथे होणारी पोटनिवडणुक ( Bye Elections ) ही बिनविरोध व्हावी ,असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

प्रसिद्धीपत्रकात राज ठाकरे यांनी म्हटले आहे की, ही निवडणूक बिनविरोध व्हावी कारण मुळात जसा त्या विधानसभेतील  कौल लोकप्रतीनिधीला असतो तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटविनडणूकीत उमेदवार मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळी मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवाराल निवडून देणे हे एका उमद्या राजकीय संस्कृतीने निधन झालेल्या व्यक्तीला दिलेली एक श्रद्धांजलीच ठरते. महाराष्ट्राच्या राजकारणाला हे नवीन नाही.

Nigdi Crime News : निगडीतील लॉजवर छापा,  मॅनेजरला अटक तर दोन महिलांची सुटका

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणूकीच्या वेळी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकीटावर उभ्या होत्या त्यावेळी मी देवेंद्र फडणवीस यांना बिनविरोध निवडणूक घेण्याचे आवाहन मी केले होते. त्या आव्हानाला प्रतिसाद देत ती निवडणूक बिनविरोध केली होती.

तीच परिस्थीती पुणे कसबा पेठ व पिंपरी-चिंचवड येथे निर्माण झाली आहे. भूतकाळात भाजपने जो उमदेपणा दाखवला तो उमदेपणा महाविकास आघाडीने दाखवावा, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून द्यावे. यापुढे ही दुःखद घटनेवेळी निवडणूका बिनविरोध व्हाव्यात , अशी इच्छा राज ठाकरे यांनी या पत्रकातून बोलून दाखवली आहे.

त्यामुळे या पोटनिवडणुकीत अप्रत्यक्षपणे का होईना पण मनसेने भाजपची बाजू घेत चर्चेमध्ये उडी घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.