Pune : पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्टेडियमसाठी सहकार्य करणार – राज ठाकरे

पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे णवंत खेळाडूंचा सत्कार

एमपीसी न्यूज –  मी लहान असताना मुंबईमध्ये क्रिकेट शिवाय इतर ( Pune ) खेळांना प्रोत्साहन दिले जात नव्हते. घराशेजारी टेनिस आणि बॅडमिंटन कोर्ट असतानाही पालकांकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहित केले जात होते. मी जर मुंबई ऐवजी पुण्यामध्ये असतो तर चांगला बॅडमिंटनपटू झालो असतो. पुणे ही बॅडमिंटन नगरी असून या ठिकाणी बॅडमिंटनसह क्रिकेट व्यतिरिक्त अनेक खेळांना प्रोत्साहन दिले जात आहे ही निश्चितच कौतुकाची बाब आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम उभारण्यासाठी संघटनेला निश्चितच सहकार्य करेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा आणि महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे पुणे जिल्ह्यातील गुणवंत बॅडमिंटनपटू आणि तांत्रिक अधिकाऱ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. संघटनेचे अध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, पीडीएमबीएचे मानद सरचिटणीस सीए रणजीत नातू, सहसरचिटणीस सीए आनंद जोशी,वरिष्ठ उपाध्यक्ष शशांक हळबे आदी यावेळी उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, पुणे शहरामध्ये बॅडमिंटन साठी आंतरराष्ट्रीय स्टेडियम आणि संग्रहालय व्हावे ही संघटनेची ( Pune ) अपेक्षा आहे, यासाठी मी राज्य पातळीवर निश्चितच प्रयत्न करेन. क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळ खेळूनही करिअर करता येते हे खेळाडूंना लहानपणापासूनच पालकांनी सांगितले पाहिजे, त्यासाठी पायाभूत सुविधाही निर्माण केल्या पाहिजे.

Alandi : गीता भक्ती महोत्सवानिमित्त शहरात विविध ठिकाणी स्वच्छता

ऑस्ट्रेलिया हा ज्याप्रमाणे खेळांचा देश म्हणून ओळखला जातो, त्याचप्रमाणे पुणे हे सुद्धा खेळांचे शहर म्हणून ओळखले जाते, या ठिकाणी केवळ क्रिकेटच नव्हे तर बॅडमिंटन सारख्या इतर खेळांनाही प्रोत्साहन दिले जाते हे खेळाडू भविष्यात ऑलिम्पिक आणि जागतिक स्तरावर भारताचे नाव निश्चितच उज्वल करतील, यामध्ये पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे मोठे योगदान आहे.

डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेचे बॅडमिंटन या खेळासाठी मोठे योगदान आहे, पुण्याचा वाढता विस्तार पाहता या संघटनेने शहराच्या मध्यवर्ती भागाप्रमाणे औंध, बाणेर, कात्रज, बावधन हडपसर अशा उपनगरांमध्येही बॅडमिंटन कॉम्प्लेक्स उभारणे गरजेचे आहे, त्यासाठी जी मदत करणे गरजेचे आहे ती संस्थेतर्फे निश्चितच केली जाईल. पुण्याच्या वाढत्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अनेक नागरी समस्या हाताबाहेर गेल्या आहेत अशावेळी पुण्यामध्ये बॅडमिंटन सह इतर अनेक खेळांमध्ये खेळाडू तयार होत असताना त्यांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

अनिरुद्ध देशपांडे म्हणाले, बॅडमिंटन या खेळाचा पुण्यामध्ये 1870 मध्ये जन्म झाला. येथूनच हा खेळ संपूर्ण जगात पोहोचला यामुळेच या खेळाला पुना गेम म्हणून ओळखले जात होते, त्यामुळे बॅडमिंटन खेळाची जन्मभूमी असलेल्या या ठिकाणी बॅडमिंटन साठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय असणे गरजेचे आहे.

यासाठी पुणे जिल्हा व महानगर बॅडमिंटन संघटनेतर्फे अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले आहे. संघटनेतर्फे महापालिकेला जागाही सुचविण्यात आल्या आहेत त्या संदर्भात राज ठाकरे यांनी राज्य पातळीवर आणि महापालिका पातळीवरही संघटनेला सहकार्य करावे, त्यामुळे पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॅडमिंटन स्टेडियम आणि संग्रहालय उभारणे संस्थेला शक्य होईल.

शरयू रांजणे, साद धर्माधिकारी, पूर्वा बर्वे, आर्य भिवपाठकी, दर्शना पुजारी, श्रुती मुंदडा, नपुरा गाडगीळ, अजित उमराणी, मंजुषा सहस्त्रबुद्धे, वृषाली उपाध्ये, गिरीश नातू, सुकांत कदम या खेळाडू आणि बॅडमिंटन पंच यांना पूना गेम ऑनर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आला. रणजीत नातू यांनी सूत्रसंचालन केले. शशांक हळबे यांनी आभार ( Pune ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.