Pune : पुणे-लोणावळा दरम्यान आज मेगाब्लॉक ; 14 लोकल रद्द

एमपीसी न्यूज  – मध्य रेल्वेच्या पुणे विभागाद्वारे पुणे-लोणावळा दरम्यान ( Pune) अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी रविवारी (दि .11 ) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे पुणे – लोणावळा -पुणे दरम्यान काही गाड्या रद्द राहतील आणि काही उशिरा धावणार आहेत.

1) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 9 .57 वाजता सुटणारी लोकल रद्द

2) पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी 11.57  वाजता सुटणारी लोकल रद्द .

3) शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी दुपारी 12.05 वाजता सुटणारी लोकल रद्द

4) पुण्याहून लोणावळ्यासाठी दुपारी 3  वाजता सुटणारी लोकल रद्द .

5) शिवाजीनगरहून तळेगावसाठी दुपारी 3.47  वाजता सुटणारी लोकल रद्द  .

6) पुण्याहून लोणावळ्यासाठी सायंकाळी 4.25 वाजता सुटणारी लोकल रद्द.

7) शिवाजीनगरवरून लोणावळ्यासाठी सायंकाळी 5.20  वाजता सुटणारी लोकल रद्द .

Pune : पुण्यामध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्टेडियमसाठी सहकार्य करणार – राज ठाकरे

लोणावळ्याहून रद्द लोकल 

1) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 10.05 वाजता सुटणारी लोकल रद्द.

2) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सकाळी 11.30 वाजता सुटणारी लोकल रद्द.

3) लोणावळ्याहून पुण्यासाठी दुपारी 2.50 वाजता सुटणारी लोकल रद्द .

4) तळेगावहून पुण्यासाठी सायंकाळी 4.40 वाजता सुटणारी लोकल रद्द .

5) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 5.30 वाजता सुटणारी लोकल रद्द.

6) लोणावळ्याहून शिवाजीनगरसाठी सायंकाळी 6.08 वाजता सुटणारी लोकल रद्द .

7) लोणावळ्याहून पुण्यासाठी सायंकाळी 7  वाजता सुटणारी लोकल रद्द .

 

एमजीआर चेन्नई – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास उशिराने धावणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले ( Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.