Pune News : सुदृढ लोकशाहीसाठी संसदीय चर्चा महत्वपूर्ण – डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज –  “संसदीय चर्चेतून नागरिकांचे प्रश्न सोडविता येतात. त्यातून अनेक धोरणात्मक कार्याची उभारणी होते. जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असलेल्या (Pune News) भारतात लोकशाही सुदृढ होण्यासाठी सर्वसमावेशक संसदीय चर्चा अत्यंत गरजेची आहे. मात्रसध्या संसदीय चर्चेचे महत्व कमी होतेय कायाचा विचार करण्याची वेळ आली आहे,असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

‘भारतीय लोकशाहीत संसदीय चर्चेचे महत्व’ या विषयावर कॅलिडस मीडिया अँड आर्टस् अकॅडमीतर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात डॉ. कोल्हे बोलत होते. घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या कार्यक्रमाला कायदेतज्ज्ञ असीम सरोदे, दूरदर्शनचे निवृत्त उपमहासंचालक शिवाजी फुलसुंदर, कॅलिडस ॲकॅडमीचे संचालक पंकज इंगोले, पूनम इंगोले, ब्रिक्सचेन चे प्रमुख अनिल मुंडे आदी उपस्थित होते.

Pune News : ‘इथे ओशाळला मृत्यू’ च्या नाट्य प्रयोगाला पुण्यात शिवभक्तांचा विरोध

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, “गेल्या नऊ वर्षात प्रशासन प्रतिकवादी, तर माध्यमे प्रतिक्रियावादी झाली आहेत. न्यायपालिका व स्वायत्त संस्थांच्या कामकाजावर अनेकदा शंका उपस्थित होत आहेत. हे लोकशाहीसाठी चांगले नाही. मतदाराने सुजाण होऊन लोकशाही, संविधान व त्याचे महत्व अबाधित (Pune News) ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे. पाशवी बहुमताच्या जोरावर विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींचा आवाज दाबणे योग्य नाही. संसदीय चर्चेत अनेक आयुधे आहेत. त्याचा बखुबीने वापर करून लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. अभ्यासू नेते घडवण्याची ताकद मतदारांमध्ये असते”

ॲड. असीम सरोदे म्हणाले, “लोकांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी यांच्यावर आहे. सगळे प्रश्न न्यायालयात सुटत नाहीत, काही प्रश्न धोरणात्मक पातळीवर संवादातून सुटतात. संसदीय प्रणालीत चर्चा होऊन प्रश्न सुटायला हवेत. लोकांचा सहभाग त्यात असायला हवा. बहुमताच्या जोरावर अनेक विधेयके चर्चेविना रेटून नेले जातात, हे योग्य नाही. लोकशाहीला कमकुवत करण्याचा प्रयत्न घटनेला धोकादायक आहे. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त भारतासाठी आपण सगळ्यांनी जागरूक व्हायला हवे. एक दिवसाचा राजा आणि इतर दिवसांचा सामान्य नागरिक ही मतदारांची ओळख पुसायला हवी.”

यावेळी युवकांनी अभिरूप संसदेतून चर्चेचे महत्व विशद करण्याचा प्रयत्न केला. मान्यवरांनी या अभिरूप संसदेचे भरभरून कौतुक केले. शिवाजी फुलसुंदर यांनी आपले मनोगत मांडले.(Pune News) संसदेचे कामकाज प्रक्षेपित होण्याचा प्रवास त्यांनी उलगडला. पंकज इंगोले यांनी स्वागत प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. प्रशांत वाघाये यांनी सूत्रसंचालन केले. पूनम इंगोले यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.