Pune News : ‘इथे ओशाळला मृत्यू’ च्या नाट्य प्रयोगाला पुण्यात शिवभक्तांचा विरोध

एमपीसी न्यूज – वसंत कानेटकर लिखित जगप्रसिद्ध नाटक ‘इथे ओशाळला मृत्यू’ याचा सोमवारी (दि.27) बालगंधर्व नाट्यगृहात प्रयोग झाला.(Pune News) नाट्यगृहात नाटकाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र नाटकात दाखवलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वभाव वृत्तीवर काही युवकांनी विरोध केला.

इथे ओशाळला मृत्यू या जगप्रसिद्ध नाटकाच्या पुनः प्रकाशनाचा हा पहिला प्रयोग होता. अभिनेता गोविंद गावडे यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली. (Pune News) नाटकाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अनुभवी कलाकार मोहन आगाशे, पूर्व गृहमंत्री सुशील कुमार शिंदे  इत्यादी उपस्थित होते.

Lonavala News : साद प्रतिसाद 2023 दहावी राष्ट्रीय बौद्धिक विकलांग परिषद लोणावळा येथे संपन्न 

नाटकामध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या दृष्टिकोनातून इतिहास बघतो. तर या नाटकांमध्ये संभाजी महाराज हे मद्यपान करतात किंवा गाण्याच्या मेहफिलीला जातात असा उल्लेख झाला आहे. भलेही नाटकामध्ये असे काही दाखवले नसून त्याची चर्चा केली आहे. पण याचा काही युवकांनी विरोध केला.

प्रयोग संपल्यावर जवळ जवळ सर्व पाहुण्यांनी आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण काही युवक रंगभूमीवर आले आणि त्यांनी हे नाटक चुकीचे आहे असे विधान केले. (Pune News) तिथे झालेल्या शाब्दिक वादानंतर या नाटकाचा प्रयोग पुन्हा झाला तर पुढे काही अनर्थ झाला तर शिवभक्त याला जबाबदार राहणार नाहीत असाही इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी नाटकात जेही दाखवले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे असे ते युवक म्हणत होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या चारित्र्याची प्रतिष्ठा खराब केली जात आहे असे या युवकांचे म्हणणे होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.