Pune : पुण्यात कारने डंपरला धडक देत घेतला पेट

एमपीसी न्यूज – पुण्यात आगाखाल पॅलेस (Pune) सोमर डंपरला मागून धडक देत कारने पेट घेतला आहे. हि घटना आज (बुधवारी) नगर-पुणे रोडवर घडली आहे.

नगर पुणे रोडवर आगाखान पॅलेस समोर एम एच 14 HU 8585 मालवाहू डंपर ला एमएच 12 क्यू एफ 5188 क्रमांकाच्या फोर्ड इकोस्पोर्ट या वाहनाने मागून धडक दिली व त्याला आग लागली.

Pimpri : राष्ट्रीय स्तरावरील इ-बाहा कार रेसिंग स्पर्धेत डी वाय पाटीलचा संघ प्रथम

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार एका प्रशिक्षित फायरमन जवानाने आपल्या हेल्मेट ने गाडीची काच फोडून वाहन चालक महिलेचे नाव नविता वय वर्ष 35 ते 37 राहणार वडगाव शेरी यांना बाहेर सुरक्षित ठिकाणी काढले व निघून गेला, समोरच असलेल्या शांतीवन सॉफ्टवेअर हब असलेल्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी कंपनीचे अग्निशमन यंत्रणा वापरून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

अग्निशमन दलाने वेळेत पोहोचून आग पूर्णपणे विझवली. (Pune) वरील कार्य प्रभारी अधिकारी सोपान पवार, ड्रायव्हर सचिन वाघमारे, फायरमन – सचिन जौजळे, संजय कारले मदतनीस राहुल वडेकर, शरद दराडे आणि अक्षय केदारी यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.