Pune News : गणपती मंदिरात भाविकांनी दान केलेली रोख रक्कम चोरीला

एमपीसी न्यूज : पुण्यातील शुक्रवार पेठेतील असणाऱ्या मारुती कोपरा गणेश मंदिरात भाविकांनी दान केलेली दानपेटीतील रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. सोमवारी रात्रीच्या दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी कौस्तुभ राजेंद्र देशमुख (वय 28) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शुक्रवार पेठेत हे मारुती कोपरा गणेश मंदिर आहे. दोन दिवसांपूर्वी मंदिराचा दरवाजा बंद असताना अज्ञात चोरट्याने मंदिराच्या शटरच्या दरवाजाचे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला.

त्यानंतर मंदिरातील लोखंडी दानपेटी चे झाकण उघडून भक्तांनी दान केलेले आठशे रुपये चोरून नेले. याच काळात सुभाष नगर येथील आचार्य अत्रे सभागृह येथे असलेल्या मंदिरातील दानपेटीतील पैसे देखील चोरीला गेलेले आहेत. खडक पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.