Same Sex Marriage : समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास केंद्राचा स्पष्ट नकार

पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार

एमपीसी न्यूज : समलैंगिक विवाहाला मान्यतेबाबत (Same Sex Marriage) प्रकरण सुप्रीम कोर्टाने मोठ्या घटनापीठाकडे पाठवलं आहे. 5 एप्रिलपासून या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार आहे. भारतीय समाजसंस्कृतीनुसार स्त्री-पुरुषांच्या नात्यालाच मान्यता देता येऊ शकते, असं केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात म्हटलं आहे. याबाबत आता  5 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास केंद्र सरकारने विरोध दर्शवला. आज सुप्रीम कोर्टामध्ये समलिंगी विवाहाच्या मान्यतेसाठी दाखल याचिकांमध्ये केंद्र सरकारची अधिकृत भूमिका स्पष्ट केली. 

 

2018 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालाने अशा समलिंगी संबंधांचं गुन्हेगारीकरण रोखलं होतं. मात्र केवळ यातून सगळे प्रश्न सुटले नाहीत, विवाहासाठीही मान्यता मिळावी यासाठी समलिंगी जोडप्यांकडून ही याचिका दाखल करण्यात आली होती. भारतीय विवाहाच्या संकल्पनेत नवरा बायको आणि त्यांचे अपत्य ही संकल्पना असताना समलिंगी विवाहांना त्यात जागा नाही अशी भूमिका केंद्राने कोर्टात मांडली.

Pune Accident : मुलीला पोलिस भरतीसाठी घेऊन आलेल्या पित्याचा अपघातात जागीच मृत्यू

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायपीठासमोर आज सुनावणी झाली. 2018 मध्ये चंद्रचूड यांच्याच न्यायपीठाने ऐतिहासिक निर्णय देत समलिंगी संबंधांना (Same Sex Marriage) गुन्हेगारीच्या कक्षातून बाहेर आणलं होतं. याबाबत आता यावर 5 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.  5 एप्रिलपासून या प्रकरणाची सुनावणी पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर होणार आहे.

 

समलैंगिक विवाहाला मान्यता मिळावी म्हणून देशातील विविध न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहे. या सर्व याचिकांचे एकत्रिकरण करण्यात आले असून सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.