Chakan : फळ विक्रेत्या महिलेची हातगाडीवरून पैशांची पर्स चोरीला

एमपीसी न्यूज – फळविक्रेत्या महिलेचे हातगाडीवरून (Chakan) पैशांची पैर्स चोरीला गेली आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही चोरी गुरुवारी (दि.22) चाकण येथे सायंकाळी घ़डली आहे.

Hinjawadi : कारमधून येऊन चौघांनी एकाला मारहाण करत लुटले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चाकण येथील युनीकेअर हॉस्पिटलसमोर फळाची हातगाडी आहे, गुरुवारी त्या फळ विकत असताना फिर्यादी यांना फळ खरेदी करण्यासाठी (Chakan) बोलण्यात गुंतवणू त्यांची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेली. त्या पर्समध्ये 81 हजार 300 रुपये रोख व 3 हजार रुपयांचा मोबाईल असा एकून 84 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरीला गेला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.