Chakan : भरधाव कारची रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दोघांना धडक; दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव कारने रस्त्याच्या बाजूला (Chakan)थांबलेल्या दोघांना धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 30) मध्यरात्री साडेबारा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर वाकी बुद्रुक येथे घडला.

योगेश वसंत कड (वय 47, रा. संतोषनगर, भाम वाकीबुद्रुक, ता. खेड) आणि एकाचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर संतोष सखाराम घोडे (वय 39, रा. पिंपरी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी भानुदास वसंत कड (वय 42) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक शामराव कदम (वय 36, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pimpri : भाजपा शहर उपाध्यक्षपदी जवाहर ढोरे, चिटणीसपदी गणेश ढोरे यांची निवड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भानुदास यांचा (Chakan)भाऊ योगेश हे वाकी बुद्रुक येथे चायनीज हॉटेल चालवत होते. शनिवारी मध्यरात्री हॉटेल बंद करून ते त्यांच्या कामगारासोबत पुणे-नाशिक महामार्गावर रस्त्याच्या बाजूला बोलत थांबले होते.

त्यावेळी पुणे नाशिक महामार्गावरून आरोपी अशोक कदम त्याच्या ताब्यातील कार (एमएच 14/जीएन 8180) भरधाव वेगात घेऊन आला. कारने योगेश आणि त्यांच्या कामगाराला जोरात धडक दिली. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. तर कारमधील संतोष घोडे हे जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.