Chakan : विक्रीसाठी दारू घेऊन जाणाऱ्या दोघांवर गुन्हा; 22 हजारांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज – आंबेठाण येथून तळवडे येथे गावठी हातभट्टीची दारू विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या दोघांना महाळुंगे पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून हातभट्टीची दारू आणि दुचाकी असा एकूण 22 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई भास्कर लक्ष्मण नागरे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चांद नामदेव ठाकुर (वय 60, रा. ज्योतीबा नगर, तळवडे), मनिराम रंग भंडारी (वय 28, रा. ज्योतीबा नगर, तळवडे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 16) सकाळी सहा वाजता पोलिसांना माहिती मिळाली की, आंबेठाण गावच्या हद्दीत दोन इसम अवैधरित्या दारुची वाहतूक करत आहेत. त्यानुसार पोलिसांनी आंबेठाण गावच्या हद्दीत सोलबनचा पाझर तलाव येथे एम एच 14 / जी एम 4871 या दुचाकी वरून जाणाऱ्या दोघांना अडवले. पोलीस दिसताच दोघेजण पळून जाऊ लागले.

पोलिसांनी दोघांना शिताफीने पकडून त्यांच्याकडून 30 लिटर गावठी हातभट्टीची दारू, मोटारसायकल असा 22 हजार 100 रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपी आंबेठाण येथून दारू नेऊन तळवडे येथे विकणार असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1