Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू; अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – रस्ता ओलांडणा-या पादचा-याला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचा-याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 11) रात्री कुरुळीफाटा येथे घडला.

स्वर्ण बक्शिश सिंग (वय 47, रा. बांधोली, ता. रामगड, जि. अलवर, राज्य -राजस्थान) असे मृत्यू झालेल्या पादचा-याचे नाव आहे. याप्रकरणी भीमसिंग रतनसिंग यादव (वय 34, रा. आकुर्डी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री जेवण करून स्वर्ण सिंग पुणे-नाशिक महामार्गावर पायी चालत जात होते. कुरुळीफाटा येथे सूरज हॉटेल समोर ते रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. त्यांना तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यानंतर पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.