Chakan Crime News : टेम्पो चालकाला लुटणा-या चौघांना अटक

एमपीसी न्यूज – टेम्पो बंद पडल्याने आडोशाला थांबलेल्या एका टेम्पो चालकाला चार जणांनी लुटले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चारही चोरट्यांना अटक केली आहे. ही घटना 11 जुलै रोजी रात्री महाळुंगे एच पी चौक ते इंडोरंस चौक दरम्यान घडली.

अनिकेत ऊर्फ माम्या आबासाहेब टेळे (वय 22), अंकित महादेव थोरात (वय 21, दोघे रा. सातारा), सौरभ पांडुरंग राशिवडेकर (वय 21), पवन सुरेश कदम (वय 19, दोघे रा. सांगली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत धुंडाप्पा यल्लाप्पा साठ्याळ (आय 44, रा. डांगे चौक, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. 16) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साठ्याळ 11 जुलै रोजी महाळुंगे एचपी चौक ते इंडोरंस चौक दरम्यान टेम्पो (एम एच 14 / डी जे 4800) घेऊन जात होते. रात्री साडेनऊ वाजता ते हार्मन कंपनी समोर आले असता त्यांचा टेम्पो बंद पडला. त्यामुळे ते टेम्पोच्या आडोशाला बसले. अचानक चार अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले. ‘ए क्या रे तू इधर क्यो बैठा है’ असे बोलून फिर्यादी यांचा 12 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन जबरदस्तीने चोरून नेला.

त्यानंतर आरोपींनी आणखी एक जबरी चोरी केली. त्याबाबत अगोदर गुन्हा दाखल झाला असल्याने पोलिसांनी तात्काळ शोध घेऊन चारही आरोपींना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.