Chakan : नातवांनी केली आजीला मारहाण

एमपीसी न्यूज – दोन नातवांनी आजीला बेदम मारहाण (Chakan)केली. यामध्ये आजीच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले. ही घटना शुक्रवारी (डी. 10) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास बीड वस्ती, चाकण येथे घडली.

सुबुद दयानंद वाघमारे, आदित्य दयानंद वाघमारे (दोघे रा. बीड वस्ती, चाकण) अशी (Chakan)गुन्हा दाखल झालेल्या नातवांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी आजीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Maratha resurvation – शिंदे सरकारसाठी मंगेश चिवटे ठरले संकटमोचक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून फिर्यादी यांचा नातू सुबुद याने फिर्यादी यांच्या मुलाला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. ते भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी गेल्या असता दोन्ही नातवांनी फिर्यादीस मारहाण केली. लाकडी दांडक्याने हातावर मार लागल्याने त्यांच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.