Chakan : हॉटेलमध्ये घुसून गोळीबार; एक जखमी तर तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : चाकण येथे एका हॉटेलमध्ये घुसलेल्या (Chakan) तिघांनी गोळीबार केला. ही घटना चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रासे ( ता. खेड ) येथील मराठा हॉटेलमध्ये सोमवारी (दि. 18) रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास घडली. हॉटेलचा मालक स्वप्निल उर्फ सोप्या संजय शिंदे ( वय 31,रासे, ता. खेड ) हा यामध्ये जखमी झाला आहेत. राहुल पवार, अजय गायकवाड आणि अन्य एक अनोळखी व्यक्ती अशा तिघांच्या विरोधात चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराच्या या घटनेला महाळुंगे येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या हत्येच्या घटनेची पार्श्वभूमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

रासे येथील गोळीबार प्रकरणी अजय गायकवाड याला चाकण पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्निल शिंदे याचे चाकण शिक्रापूर रस्त्यावर रासे गावाच्या परिसरामध्ये हॉटेल आहे. स्वप्नील हॉटेलमध्ये असताना सोमवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास तिघेजण हॉटेलमध्ये आले. त्यांनी हॉटेलमध्ये दोन राउंड फायर केले. यामध्ये स्वप्निल शिंदे यांच्या डोक्याला एक गोळी चाटून गेल्याने दुखापत झाली आहे. स्वप्निल शिंदे आणि आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून सर्वजण तडीपारीच्या कारवाईच्या कारवाईतील आरोपी आहेत.

Mumbai : ब्रेस्ट प्रांत आणि महाराष्ट्र यांच्यात सहकार्य करार करण्यास बेलारुस उत्सुक – अलियाक्सांद्र मात्सुकोऊ

रासे येथील गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळतात चाकण पोलिसांसह (Chakan) गुन्हे शाखेची पथके घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळी पोलिसांना एक काडतूस मिळून आले. पोलिसांनी तातडीने तपास करत अजय गायकवाड याला अटक केली आहे. तर अन्य दोघांच्या शोधात पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान यातील संशयित आरोपी राहुल पवार याचा लहान भाऊ रितेश पवार ह्याचा चार महिन्यापूर्वी चाकण एमआयडीसी मध्ये महाळुंगे ( ता. खेड ) येथे निर्घृण खून झाला आहे. त्या खुनातील आरोपींना स्वप्नील उर्फ सोप्या शिंदे याने मदत केली असल्याच्या संशयावरून हा गोळीबार झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ , सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जराड यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस या बाबतचा अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.