Chakan : चाकणमध्ये दिव्यांग मार्गदर्शन व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज -चाकण येथील लायन्स क्लबच्या सभागृहात विविध दिव्यांग ( Chakan ) कल्याणकारी उपक्रमांनी दिव्यांग मार्गदर्शन व स्नेहमेळावा दोन सत्रात उत्साहात संपन्न झाला. यावेळी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल दीडशेहून अधिक दिव्यांग बांधवांनी हजेरी लावत मेळाव्याचा लाभ घेतला.

मेळाव्याला चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे, पुणे दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या वसुली निरीक्षक सविता मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.   प्रस्ताविकपर भाषणात दिव्यांग मित्र विजय पगडे यांनी ग्रुपच्या संपूर्ण कार्याचा लेखाजोखा मांडला.

अंकुश आगरकर म्हणाले पालकांनी दिव्यांगांना कमी न लेखता त्यांच्याकडे संधी म्हणून पाहत त्यांना प्रोत्साहन मिळेल अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे, विशेष मुलांना घरात न ठेवता समाजात आणले तर या मुलांमध्ये अधिक प्रगती होऊ शकते. गणेश गरुड यांनी दिव्यांग बांधवांच्या प्रत्येक कार्यक्रमांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. बाळासाहेब मुटके यांनी दिव्यांग बांधवांच्या कल्याणार्थ लायन्स क्लबची ध्येय-धोरणे स्पष्ट केली. चैतन्य कुलकर्णीने त्याची संघर्षगाथा कथन केली.

Pune : पुणे पंढरपूर मार्गावर एसटी बस आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात

प्रथम सत्रात दिव्यांग बांधवांनी एकमेकांशी हितगुज साधले. दिव्यांग महामंडळाकडून व्यवसायिक कर्जासाठी मार्गदर्शन व फॉर्म वाटप झाले. दिव्यांगबांधवांत देखील दातृत्वाची भावना असल्याचे स्पष्ट करत गरजू दिव्यांगांना आर्थिक मदत देण्यात आली. अकबर पठाण, बाळू दुबाले, सुशिला वेदपाठक यांना व्यवसायासाठी व रिया ताठे, सुरेखा कामठे, सुनीता धायबर यांना उपचारांसाठी तर अवकाळी पावसात घर पडलेल्या सचिन वाघमारेला घर बांधणीसाठी मदत देण्यात आली. विजय पगडे दिव्यांग मित्र परिवारातील सर्व सदस्यांनी संयोजन केले. बेलाजी पात्रे यांनी सूत्रसंचालन केले. जयश्री धायबर यांनी आभार मानले.

 विशेष मुलांनी मिळवली वाहवा
द्वितीय सत्रात स्नेहभोजन व विशेष दिव्यांग बांधवांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळावा म्हणून आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम झाला. यात दुर्वा आगरकर, समिक्षा डोळस, अभिषेक पानमंद, माधुरी लोढें, यश काकडे, ईश्वरी गोसावी या विशेष दिव्यांग मुलांनीदेशभक्तीपर ये है जलवा, अप्सरा आली, केळेवालीला घेणार का, दर्द करारा या गाण्यांवर अप्रितीम नृत्य सादरीकरणाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या चिमुकल्यांनी सर्वांची वाहवा मिळवीत रोख बक्षिसांची ( Chakan ) लयलूट केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.