Monsoon : 48 तासात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज;

बिपरजॉय चक्रीवादळाने दिली मॉन्सूनला गती

एमपीसी न्यूज -पुढच्या 48 तासात मान्सून महाराष्ट्रात (Monsoon) दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळाने मॉन्सूनला गती दिली आहे.

सध्या केरळमध्ये मान्सून दाखल झाला आहे.  पण त्यापूर्वीच राज्यातील काही भागात मान्सून पूर्व पावसानं वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. राज्यातील हिंगोली, नंदूरबार, नाशिक, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. अरबी समुद्रातील “बिपरजॉय” चक्रीवादळाने मॉन्सूनला गती दिली आहे.

Chakan : चाकणमध्ये दिव्यांग मार्गदर्शन व स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

कर्नाटकच्या सीमेजवळ तो पोहोचला असून लवकरच तो गोवा आणि महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.दहा जूनला मॉन्सूनने किनारपट्टी भागात वाटचाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा भाग व कर्नाटकचा किनारपट्टी भाग बंगालच्या उपसागराचा आणखी भागात  मजल मारली आहे. सध्या मॉन्सूनने केरळमध्ये हजेरी लावली असून तामिळनाडूचा भरपूर भाग व्यापला आहे. महाराष्ट्रात मॉन्सूनचे आगमन बारा जूनपर्यत होणार असल्याचे हवामान विभागाकडून (Monsoon) सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.