Chakan Murder Case : महिलेचा खून करून मृतदेह पुरला जंगलात

एमपीसी न्यूज : खून करून (Chakan Murder Case) महिलेचा मृतदेह निर्जन भागात नेऊन गाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाकण पोलिसांनी महिलेचा पुरलेला मृतदेह चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलातून गुरुवारी (दि. 6  ऑक्टोबर) रात्री उशिरा ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

आशा गोरक्षनाथ देशमुख (सध्या रा. बोरजाईनगर, मेदनकरवाडी, ता. खेड, मूळ रा. श्रीगोंदा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. संबंधित महिला मागील महिन्याभरापासून बेपत्ता होती. चाकण पोलिसांत याबाबत तिच्या पतीने तक्रार दिली होती. दरम्यान, पोलिसांनी चौकशीसाठी काही जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

Chakan Accident : भरधाव जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

जमिनीत पुरल्याने कुजलेला हा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चाकण (Chakan Murder Case) ग्रामीण रुग्णालयात रात्री आठच्या सुमारास आणण्यात आला आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.