Gujrati Samaj : गुजराती समाजाच्या वतीने शहरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सत्कार

एमपीसी न्यूज – प्राधिकरण येथील श्री द्वारकाधिश सेवा मंडळ व गरवी गुजराती (Gujrati Samaj) समाजाच्या वतीने रावेत येथे नवरात्री उत्सवाच्या सांगता निमित्त पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणार्‍या सेवाभावी संस्था, व्यक्ती आदींचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार आमदार उमा खापरे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी श्री द्वारकाधिश सेवा मंडळाच्या अध्यक्षा किरण पटेल, गरवी गुजराती समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा, धनश्याम गजेरा, भरत दवे, ऋतिक पटेल, हार्दिक जानी, राम राज्यगुरु, जेन्ती राठोड, जिग्नेश पटेल, गीरधर विराणी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमात अमित गोरखे (शैक्षणिक), सुर्यकांत मुथीयान (पर्यावरण), अशोक तनपुरे (पोलिस मित्र संघटना), जतीन परमार (मानवी हक्क सेवा), डॉ. गणेश अंबिके (आरोग्य व आपत्ती व्यवस्थापन), गुलाम अली भालदार (चिंचवड प्रवासी संघ), सुरज आसदकर (वृत्तपत्रातील डिझाईनर), सुहास जोशी (अन्नदान आरोग्य), विल्यम साळवी (व्यसनमुक्ती) यांना स्मृतीचिन्ह व शाल देवून गौरविण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना (Gujrati Samaj) आमदार उमा खापरे म्हणाल्या की, माझे बालपण मुंबईत गेले. आज येथे पारंपारिक गुजराती गायक, वादकांच्या सुर-तालाने मी मंत्रमुग्ध झाली असून येथे अनेक वर्षांनी गरबा खेळ खेळून माझ्या बालपणाची आठवणी ताज्या झाल्या.

Shivsena Result : धनुष्यबाण कोणाचे? निवडणूक आयोग देणार आज निकाल

देशभरात गुजराती समाज (Gujrati Samaj) हा सण मोठ्या आनंदाने साजरा करतो. नवरात्रौ महोत्सवात येथील संस्थांनी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करून खर्‍या अर्थाने नवरात्रौ सणानिमित्त जणू राष्ट्रीय एकात्मता निर्माण केली. सत्कारमुर्ती सर्व मान्यवरांनी शहराच्या विकासात आपापल्या क्षमतेनुसार कार्यरत आहे. अशांना एकत्रित करून त्यांना गौरविण्यात आले. ही देखील कौतुकास्पद बाब आहे.

श्री द्वारकाधिश सेवा मंडळाच्या अध्यक्षा किरण पटेल यांच्याहस्ते आमदार उमा खापरे यांचा खास स्मृतिचिन्ह गौरव व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना गरवी गुजराती समाजाचे अध्यक्ष मुकेश चुडासमा यांनी केले. तर आभार भरत दवे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.