Chakan : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक; 20 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या (Chakan) एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून 20 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 9) सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास चाकण येथे करण्यात आली.

आशिष शिवपूजन पांडे (वय 28, रा. भुजबळ चौक, वाकड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह साईसिंग (रा. शहादा, जि. नंदुरबार) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकाजवळ एकजण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

Pune : आजपासून पुणे ते अमरावती विशेष रेल्वे सुरू; विदर्भवासियांसाठी रेल्वेची खास दिवाळी भेट

त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या पोलिसांनी सापळा लावून आशिष याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी (Chakan) 20 किलो 221 ग्राम गांजा, एक मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 20 लाख 41 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.