Chakan : जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपाउंडच्या तारा काढून जागेत अतिक्रमण केले. तसेच येण्या-जाण्याची वाट अडवल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार आंबेठाण येथे घडला आहे.

शांताराम खुशाबा घाटे, शारदा शांताराम घाटे, विशाल शांताराम घाटे, राजू शांताराम घाटे (सर्व रा. आंबेठाण, ता. खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयेश कांतीलाल संघवी (वय 54, रा. गुलटेकडी, पुणे) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील आंबेठाण येथे फिर्यादी जयेश यांची जमीन आहे. जमिनीच्या भोवतीने त्यांनी तारेचे कंपाउंड केले आहे. आरोपींनी ते तारेचे कंपाउंड काढून जयेश यांच्या जागेत टपरी आणि गवताच्या पेंढ्या ठेवून अतिक्रमण केले. तसेच शुक्रवारी (दि. 13) दुपारी अडीचच्या सुमारास आरोपींनी जयेश यांच्या जाण्या-येण्याच्या जागेत टेम्पो लावून त्यांची वाट अडवली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.