Chakan : पुणे नाशिक महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे नाशिक महामार्गावर चाकण (Chakan) येथे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 29) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.

समीरउद्दीन चोलोमियां अन्सारी (वय 57) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आजीमुद्दिन युसुफ अन्सारी (वय 43, रा. खंडोबा माळ, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी बाळासाहेब दत्तात्रय राऊत (वय 33, रा. नागटाळा, ता. आष्टी, जि. बीड) यास अटक केली आहे.

Pune : मेट्रो स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी महाराजनगर करण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनेचे आंदोलन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासरे समीरउद्दीन अन्सारी (Chakan) हे त्यांच्या दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गावरून तळेगाव चौक चाकण ते आंबेठाण चौक चाकण येथे जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून येणारा ट्रक (एमएच 16/बीसी 6471) चालकाने ट्रक भरधाव वेगात चालवून समीरउद्दीन यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये समृद्धीने गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.