Chakan: पिकअप व दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : –  दुचाकीला पिकअप  ने दिलेल्या जोरदार धडकेमध्ये दुचाकी( Chakan)स्वाराचा मृत्यू झाला आहे.हा अपघात शुक्रवारी (दि.1) मेदनकरवाडी चौक,चाकण येथे झाला आहे.
या अपघातात दुचाकीवरील विकी राजेंद्र वडतेरा (रा. चाकण) यांचा मृत्यू झाला आहे तर चैतन्य रमेश निंबाळकर हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात संघर्ष नामदेव गचे (वय 18. रा. चाकण) यांनी फिर्याद दिली असून पीकअप चालक श्रीनाथ भरत पांचाळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra : शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यातील पीकअप ही रहदारीत देखील वेगाने चालवत होता. मेदन कर वाडीत चौकात त्याने ओव्हरटेक करताना वडतेरा याच्या दुचाकीला मागून धडक दिली. या अपघातात वडतेरा यांचा डोक्याला मार लागला म्हणून मृत्यू झाला तर चैतन्य हा जखमी झालं. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share