Talegaon Dabhade : साहित्य हाच समाजाचा खरा चेहरा – डॉ.न. म. जोशी

एमपीसी न्यूज – मराठी भाषा गौरव दिन कसा आणि कशासाठी (Talegaon Dabhade)सादर करावा हे आजच्या या कार्यक्रमातून संस्थेने दाखवून दिले आहे. साहित्यिक आणि त्याचे लेखन जपले पाहिजे. खरंतर साहित्यिक हाच समाजाचा खरा सांस्कृतिक चेहरा आहे, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक डॉ. न. म.जोशी यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे साहित्य कला आणि संस्कृती मंडळाने, मराठी भाषा गौरव दिनानिमित (Talegaon Dabhade)पुणे जिल्ह्यातील 32 नियं‌त्रित कवीचे काव्य संमेलन तसेच प्रतिभासंपन्न साहित्यिकांच्या प्रदीर्घ साहित्य सेवेचा सन्मान चिन्हासह सन्मानपत्र प्रदान करून भव्य समारंभपूर्वक गौरव करण्यात आला.तळेगाव च्या श्री संताजी महाराज चौकातील तेली समाज कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
 समारंभाचे अध्यक्ष म्हणून डॉ.न म जोशी  बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मराठी भाषा अभ्यासक प्राचार्या रेखा दीक्षित तसेच श्रीमंत सरसेनापती याज्ञसेनीराजे दाभाडे या व्यासपीठावर उपास्थित होत्या. कवी संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ हास्य कवी बंडा जोशी यांनी भूषविले.ज्येष्ठ शिक्षणतज्ञ साहित्यिक
तळेगांव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी  एन. के पाटिल स्वागताध्यक्ष  उपनगराध्यक्ष गणेश काकडे हे उद्घाटक पदी होते.  एन.के. पाटिल  यांनी शासन पुरस्कृत कार्यक्रमाने मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी दाखवून दिली.
 त्यानंतर, कराडचे निसर्गकवी विलास कदम यांच्या ‘स्वप्नविलास’  या काव्यसंग्रहाचे शानदार प्रकाशन करण्यात आले . प्रमुख पाहुण्या रेखा दीक्षित यांनी मराठी कविच्या प्रवासाचा आढावा घेऊन यावेळी प्रकाशित काव्यसंग्रहातील कवितांचा दाखला देत काव्यसंग्रहाचं आणि कवी कदम यांच्या लेखन शैलीच कौतुक केलं.

 

त्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा ॲड. रंजना भोसले यांनी मराठी भाषा गौरव दिनाचे महत्व विषद करून तिच्या प्रगल्भतेसाठी काम करण्याची भूमिका जाहीर केली. त्यास दुजोरा देत संस्थेचे सस्थापक मुख्य विश्वस्त ॲड. सहदेव मखामले यांनी “शासनाने जिल्ह्या जिल्ह्यात व गावा गावांत असे कार्यक्रम राबून मराठी भाषा संवर्धन करणे जेणे करून मराठी भाषा साहित्यिकांचा मूलभूत व्यासंग जपला जाईल” असे आवाहन केले.
निमंत्रित कवींच्या रचनांना उपस्थितांनी भरभरून दाद दिली. कवी संमेलनाध्यक्ष   बंडा जोशी यांनी विनोदी रचना सादर करून उपस्थितांना स्तिमित केले.
सर्वश्री शैलेश मखामले (कोषाध्यक्ष), देवेन्द्र बारमुख, स्नेहल बाळसराफ, ॲड. सीमा शर्मा,  अनुराधा पवार, ज्योती शिंदे,  निशा पवार,  यांनी मान्यवरांचे स्वागत करून ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कवयित्री अमृता चव्हाण देशमुख यांनी केले. आरती पेंडभाजे यांनी आभार मानल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.