Maval : टाकवे बुद्रुक येथील शिवशाही मित्र मंडळाचे वतीने विद्यार्थ्यांना कंपास पेटीचे वाटप

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील (Maval) शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूल टाकवे या शाळेतील मुलांना कंपास पेटीचे वाटप करण्यात आले.

या वेळी टाकवे गावचे माजी उपसरपंच,शिवशाही मित्र मंडळाचे संस्थापक स्वामी जगताप,माजी सरपंच भूषण असवले,सचिव बाबाजी असवले, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप मालपोटे,माजी उपसरपंच परशुराम मालपोटे,टाकवे बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे माजी संचालक दिलीप आंबेकर,जीप संघटना अध्यक्ष उल्हास असवले, शिवसेना टाकवे शहर अध्यक्ष संपत जगताप,मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मोढवे,तसेच प्राथमिक शाळा मुख्याध्यापक (Maval) वंदना असवले व बाळराजे असवले इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक राज कांबळे आदी उपस्थित होते.

Maharashtra : शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्यासाठी 8 हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित

शिवशाही मित्र मंडळाच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आरोग्य शिबीर, क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी, चष्मे वाटप, शालेय साहित्य वाटप, किल्ले बनवा स्पर्धा, दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यी सन्मान असे विविध उपक्रम वर्षभर चालवले जातात. शिव जयंती, श्रीगणेशोत्सव, ज्येष्ठ नागरिक नेत्रतपासणी, वेटलीफ्टींग स्पर्धा असेही उपक्रम शिवशाही मित्र मंडळाकडून राबवले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.