22.2 C
Pune
मंगळवार, ऑगस्ट 16, 2022

Rain Alert : राज्यात पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने आता पुन्हा जोर धरला आहे. सध्या राज्यात मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून तो राजस्थान ते पूर्व बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.भारतीय हवामान विभागाने पश्चिम महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार काही भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

 

राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून, मान्सूनच्या पावसाची पुन्हा सुरुवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे दक्षिण कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पुढील पाच दिवस मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे.

 

भारतीय हवामान खात्याने याबाबत व्टिट करीत माहिती दिली आहे. राज्यात पाच दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.येत्या 24 तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरकळ ठिकाणी जोरदार सरी तसेच किनारपट्टीलगत सोसाट्याचे वारे वाहतील. मराठवाड्यात विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

 

या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

 

रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदीया.

spot_img
Latest news
Related news