Weather Report : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्‍यता

Chance of torrential rain in sparse places in Konkan Goa.

एमपीसी न्यूज – राज्यात येत्या 24 तासांत कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. तसेच, उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.

गेल्या 24 तासांतील पर्जन्यमान : कोकण गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मुसळधार पाऊस पडला. कोकण गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (सेंमी मध्ये) 1 सेंमी पेक्षा जास्त) खालीलप्रमाणे :

कोकण आणि गोवा : खालापूर 7, अंबरनाथ, उल्हासनगर 6 प्रत्येकी, चिपळूण, जव्हार, मंडणगड, मोखेडा, फोंडा, सांगे, विक्रमगड 5 प्रत्येकी, भिरा, माथेरान, केप, संगमेश्वर देवरुख, शहापूर, सुधागड पाली 4 प्रत्येकी, भिवंडी, डहाणू, दोडामार्ग, कणकवली, कर्जत, लांजा, म्हसळा, पालघर, पेन, पेडणे, पोलादपूर, राजापूर, सावंतवाडी, तलासरी 3 प्रत्येकी, बेलापूर (ठाणे), कल्याण, खेड, कुडाळ, महाड, माणगाव, म्हापसा, मुरबाड, रत्नागिरी, रोहा, श्रीवर्धन, ठाणे , वेंगुली, वाडा 2 प्रत्येकी, अलिबाग, कानाकोना, देवगड, गुहागर, मालवण, मुंबई (सांताक्रूझ), पंजिम (गोवा), पनवेल, वैभववाडी, वसई प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी 9, गगनबावडा 8, ओझरखेडा 6, महाबळेश्वर, सुरगाणा, तळोदा 5 प्रत्येकी, मुल्दे, पेठ, त्र्यंबकेश्वर 4 प्रत्येकी, नवापूर, पन्हाळा, शाहुवाडी 3 प्रत्येकी, आजरा, चांदगड, राधानगरी 2 प्रत्येकी, अकोले, भोर, दिंडोरी, जावळी, मेधा, नंदुरबार, ओझर, पाटण, शिराळा, वडगाव मावळ 1 प्रत्येकी.

मराठवाडा : रेणापूर 3.

विदर्भ : गोंड पिपरी 8, सालेकसा 7 आमगाव, गोरेगाव, मुल 6, राजुरा, सडक अर्जुनी, साकोली 5 प्रत्येकी, बल्लारपूर, चिमूर, कुही, लाखनी ४ प्रत्येकी, भद्रावती, भंडारा, देवरी, शिंदेवाहि 3 प्रत्येकी, अकोला, अमरावती, आर्वी, हिंगणा, जिवती, कंपटी, साओली, सावनर, तिरोरा 2 प्रत्येकी, अर्जुनी मोरगाव, आर्मोरी, बाटकुली, चांदूर, दर्यापूर, धामणगाव, गोंदिया, कलमेश्वर, काटोल, खरंगा, कोरपना, लाखंडूर, मौडा, नाग भिर, नागपूर एपी, नांदगाव काजी, पोंभुर्णा, रामटेक, सेलू, तिवसा, उमरेड, वरोरा 1 प्रत्येकी

घाटमाथा : कोयना (नवजा) 8, अम्बोणे 7, ताम्हिणी, दावडी शिरगाव प्रत्येकी, कोयना(पोफळी) 5 प्रत्येकी, डोंगरवाडी 4, खोपोली 3, लोणावळा(टाटा), शिरोटा, खंद, भिवपुरी, वळवण लोणावळा(ऑफिस) 2 प्रत्येकी, ठाकूरवाडी, वाणगाव 1 प्रत्येकी.

पुढील हवामानाचा अंदाज :

24 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

25 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍्यता.

26 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता.

27 ऑगस्ट : कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी; विदर्भात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

इशारा:

24 ऑगस्ट : कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍्यता.उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्‍्यता.

25-26 ऑगस्ट: काही नाही.

27 ऑगस्ट : कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्‍्यता.

पुणे आणि आसपासच्या परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस सरी पडण्याची शक्यता पुणे वेध शाळेने वर्तवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.