Bhosari: उपचाराचा खर्च परवडत नसल्याने गर्भपात करण्यास सांगणाऱ्या सासरच्या चौघांवर गुन्हा

charged for asking for abortion in bhosari महिलेने गर्भपातास नकार दिल्याने आरोपींनी आपसात संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

एमपीसी न्यूज – उपचाराचा खर्च परवडत नसल्याने सासरच्या चौघांनी विवाहितेला गर्भपात करण्यास सांगितले. तसेच मुलाच्या हव्यासापोटी सासरच्या चौघांनी मिळून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. ही घटना फेब्रुवारी 2005 ते ऑक्टोबर 2015 दरम्यान जुन्नर येथे घडली.

याप्रकरणी पीडित महिलेने शनिवारी (दि.1) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्रंबक नाथ भागवत (वय 42, रा. अंजनवळे, जुन्नर), नाथा भागवत (वय 75), कांताबाई भागवत (वय 63), यमुना नवनाथ गाडेकर (वय 45, सर्व रा. जुन्नर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिला सासरी नांदत असताना आरोपींनी उपचाराचा खर्च परवडत नसल्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले. महिलेने गर्भपातास नकार दिल्याने आरोपींनी आपसात संगनमत करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.

तसेच, आम्हाला मुलगाच पाहिजे व माहेराहून पैसे आण, अशी मागणी करीत त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास एमआयडीसी भोसरी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.