Charholi Kurd :बळीराजा संकटात कसा जाईल, असे निर्णय सरकारकडून घेतले जात आहे -शरद पवार

एमपीसी न्यूज -राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांच्या (Charholi Kurd)वाढदिवसानिमित्त 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत साहेब केसरी या बैलगाडा शर्यतीचे च-होली खुर्द येथे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष मी सेवेकरी सोशल फाऊंडेशनचे सुधीर मुंगसे व सोमनाथ मुंगसे हे या शर्यतीचे आयोजक होते.दि.17 रोजी आज च-होली खुर्द येथे साहेब केसरी या बैलगाडा शर्यतीच्या वेळी शरद पवार यांनी हजेरी लावली होती.

खासदार डॉ अमोल कोल्हे यावेळी म्हणाले अत्यंत (Charholi Kurd)देखणं नियोजन व डोळ्यांचे पारणे फिटावअशी साहेब केसरी बैलगाडा शर्यत स्पर्धा आयोजित केली आहे.2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी जीव तोडून गाडा सुरू झाला पाहिजे हा हट्ट धरला होता.

आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने निवडून गेलो.तेथे परिस्थिती अशी होती लोकसभेत बोलायला उभ राहायलो बाकीचे खासदार थट्टेने विचारायचे गाड्या विषयी बोलणार की शिवाजी महाराजां विषयी बोलणार?बैलगाडा शर्यत केवळ परंपरा नाहीतर हा आमचा श्वास आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे साधन आहे. बैलगाडा शर्यत देशी गोवंश रक्षण आहे.ही भूमिका मांडत असताना यापठीमागे संपूर्ण मार्गदर्शन शरद पवार साहेबांचे होते.तसेच यावेळी शरद पवार घाटात उपस्थित असल्याने अमोल कोल्हे यांनी त्याबद्दल भावना व्यक्त केल्या. बैलगाडा शर्यत ही जागतिक पर्यटन झाली पाहिजे.तो नाद न राहता संपूर्ण जगाच लक्ष वेधणारी स्पर्धा झाली पाहिजे.यासाठी पवारांनी मार्गदर्शन करावे असे यावेळी ते म्हणाले.


तसेच ते सरकारवर टीका करताना म्हणाले तुमचा आमचा लढा अजून बाकी आहे, कांदा निर्यातीचा प्रश्न असो दुधाला भाव नाही.सरकारच्या सत्तेच्या राजकारणा विषयी ते म्हणाले बैल कोणाचा ही आणा ,कोणत्याही बैला बरोबर जोडी जुळवा,बारी बसण्याचा प्रयत्न करा असे सध्याचे सरकार चाललंय.जोपर्यंत शेतकऱ्यांच भलं होत नाही ,तोपर्यंत बारी काय नंबरात बसली नाही असं आपण म्हणणार नाही.

Shirgaon : ट्रॅक्टर अंगावर उलटल्याने पादचाऱ्याचा मृत्यू
यावेळी शरद पवार म्हणाले बैलगाडा शर्यतीच्या संबंधीचे दुखणे देशाच्या संसदेत ज्यांनी मांडले आणि प्रश्न सोडून घेतला दिलेला शब्द पुरा केला. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात बैलगाडा संबधी असलेल्यांना न्याय दिला.असे आपले खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे विचार या ठिकाणी आपण एकलेत.

शरद पवार पहिल्यांदाच बैलगाडा शर्यत सोहळ्याला उपस्थित होते. “आजपर्यत टिव्हीवर बैलगाडा शर्यती पाहिल्या पण घाटात आल्याशिवाय डोळ्याचे पारणं फिटत नाही,” अशा शब्दात पवारांनी शर्यतीचे कौतुक केले. “बैलगाडा शर्यत हि वेगवान स्पर्धा आहे. बैलगाडा शर्यतीबाबत धोरणात्मक निर्णय घेतले तर जागतिक पातळी नावलौकिक मिळेल,” असा विश्वास पवारांनी व्यक्त केला.

ज्यांचा हातात सत्ता आहे, त्यांना बळीराजाची चिंता नाही. शेतमालाला बाजार नाही. कांद्या निर्यातबंदी केल्यानंतर शेतक-यांवर संकट ओढवले आहे. बळीराजा संकटात कसा जाईल, असे निर्णय सरकारकडून घेतले जात आहे.

पण एकजुटीवर जोरावर महाराष्ट्राचे चित्र लवकरच बदलणार आहे. काहीजण मला म्हणतात तुम्ही 83 वर्षांचे आहात. पण मी अजूनही तरुणच आहे, लवकरच नवा इतिहास घडविणार,” असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैलगाडा घाटात शेतकऱ्यांसमोर केला. यावेळी माजी आमदार विलासराव लांडे, विठ्ठल मणियार, हिरामण सातकर, देवेंद्र बुट्टे पाटील,देवदत्त निकम ,बबनराव कुऱ्हाडे व हजारो गाडा शौकीन नागरिक उपस्थित होते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.