Maval News : कोथूर्णे घटनेतील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री देणार पाच लाखांची मदत;माजी मंत्री बाळा भेगडे यांची माहिती

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील कोथूर्णे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि खून प्रकरणातील पीडित कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच लाख रुपयांची मदत करणार आहेत. माजी मंत्री बाळा भेगडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी या मदतीची घोषणा केल्याचे भेगडे यांनी सांगितले. पीडित कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी भेगडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली.

 

माजी राज्यमंत्री भेगडे यांनी गुरुवारी (दि.18) मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पीडित कुटुंबीयांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. तसेच,पीडित कुटुंबीयांना आधार देण्यासाठी आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच पीडित कुटुंबाच्या खात्यात पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.