Talegaon Dabhade News : नगरसेवकांना मुख्याधिकाऱ्यांचे चहापानाचे निमंत्रण

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील सध्याच्या विद्यमान नगरसेवकांचा कार्यकाल 6 जानेवारी रोजी संपत आहे. त्यानिमित्त नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी गुरुवार (दि. 6) सर्व नगरसेवकांना चहापानाचे निमंत्रण दिले आहे.

तळेगाव नगरपरिषदेतील सध्याच्या नगरसेवकांचा कार्यकाल (दि 6) जानेवारीला पूर्ण होत आहे. त्यास अनुसरून विद्यमान नगरसेवकांच्या अनौपचारिक बैठकीचे आयोजन गुरुवारी सायंकाळी पाच वाजता नगरपरिषद प्रशासनाने सभागृहात केले आहे.

या वेळी सन्माननीय सदस्यांच्या अनौपचारिक गप्पा होतील. विकास कामाबाबत चर्चा होणार नाही असेही मुख्याधिकारी दिघे यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर चहापानाचे नियोजन देखील करण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी नगरसेवकांना पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.