Pimpri News : अंदाजपत्रकात क्रीडा व स्थापत्य क्रिडा विभागास पुरेशा तरतुदी ठेवा – उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज – भारतातील प्रसिद्ध महापालिकांमध्ये क्रीडा विभागासाठी विशेष निधीची तरतूद केली जाते. यामुळे विविध सुविधा मिळाल्यामुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू  निर्माण होत असतात. त्याला अनुसरून क्रीडा विभाग व स्थापत्य क्रिडा विभागास सन 2022-23  च्या महापालिकेच्या अंदाजपत्रकात पुरेशा तरतुदी ठेवण्यासाठी क्रीडा सभापती उत्तम केंदळे यांनी  आयुक्त राजेश पाटील यांना पत्र दिले आहे.

पकेंदळे यांनी पत्रात म्हटले आहे की,पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मध्ये क्रीडा धोरणास प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र पणे क्रिडा समिती व क्रीडा स्थापत्य विभाग निर्माण करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका “क्रीडा हब” म्हणून विकसित होत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सध्या सुमारे 24 मैदाने, 15 बॅडमिंटन हॉल, 10 लॉन टेनिस कोर्ट,78 व्यायामशाळा, 14 जलतरण तलाव तसेच इतर क्रिडा सुविधा उपलब्ध आहेत. तसेच यात नव्याने निर्माण होणाऱ्या सुविधांची भर पडत आहे.फेब्रुवारी 2020 मध्ये क्रिडाविषयक कामांसाठी स्वातंत्र स्थापत्य क्रीडा विभाग स्थापन करण्यात आलेला आहे.

भारतातील इतर काही प्रसिद्ध महानगरपालिकांमध्ये वार्षिक अंदाज पत्रकाच्या सुमारे 5 ते 6 टक्के इतकी रक्कम क्रीडा विभागासाठी राखून ठेवण्यात येते. त्यामुळे सदर ठिकाणी चांगल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा सुविधा उपलब्ध झाल्याने चांगले खेळाडू तयार होऊन राज्य व देशाचे नाव उंचावत आहेत.वरील बाबींचा विचार करता महानगरपालिकेतील सध्याच्या सर्व क्रिडा सुविधांची स्थापत्य विषयक दुरुस्ती, देखभालीची तसेच सुधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे आवश्यक आहे.

तसेच मनपा मध्ये नव्याने क्रिडा सुविधा पुरवणे आवश्यक आहे.या वरील बाबींचा विचार करून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सन 2022-23  चे वार्षिक अंदाजपत्रकामध्ये क्रिडा विभाग व स्थापित क्रीडा विभाग या विभागांसाठी भरीव तरतूद करण्यात यावी अशी मागणीही पत्राद्वारे प्रा केंदळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.