Chikhali : सौदी अरेबियामध्ये नोकरीस लावण्याच्या बहाण्याने पाच जणांना साडेचार लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – सौदी अरेबिया देशात चांगल्या पगाराच्या नोकरीस लावण्याचे आमिष दाखवून पाच जणांकडून वेळोवेळी 4 लाख 43 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना नोकरी न दिल्याने एका तोतयावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार कुदळवाडी पवारवस्ती येथे 17 मार्च 2016 ते 6 जानेवारी 2019 या कालावधीत घडला.

रियाझ रफिक कुरेशी (वय 37, रा. पवारवस्ती, कुदळवाडी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार परवेझ कायमुद्दीन अन्सारी (रा. काळभोरनगर, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी रियाझ, त्यांचा सख्खा भाऊ, चुलत भाऊ, दानिश कुरेशी व अशरफअली यांना सौदी अरेबिया येथे चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे आमिष दाखवले. त्यासाठी आरोपीने 17 मार्च 2016 ते 6 जानेवारी 2019 या कालावधीत पाच जणांकडून 4 लाख 43 हजार रुपये घेतले. पैसे घेऊन देखील नोकरी न दिल्याने परवेझ याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.