Chikhali : खाऊ देण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग; संशयितावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – खाऊ देण्याच्या बहाण्याने बारा वर्षीय मुलीचा विनयभंग करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि. 19) सायंकाळी सहाच्या सुमारास कुदळवाडी, चिखली येथे घडली.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी समसुद्दीन (रा. कुदळवाडी, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी महिला यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. पीडित मुलगी आईसोबत दुकानावर असताना आरोपी समसुद्दीन याने खाऊ व पैसे देण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून तिचा विनयभंग केला. पुढील तपास चिखली पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.