Chikhali Crime News: ‘तू घरातून निघून जा नाहीतर गॅलरीतून खाली फेकीन’ म्हणत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेने पैसे आणण्यास नकार दिल्याने तिला ‘तू घरातून निघून जा नाहीतर तुला गॅलरीतून खाली फेकीन’ अशी धमकी देत तिचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या बाबत पीडित विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार पती वैजिनाथ गोरोबा क्षीरसागर, सासरा गोरोबा गुंडिबा क्षीरसागर, सासू शांताबाई गोरोबा क्षीरसागर (तिघे रा. चिखली), नणंद शीतल मुकेश गायकवाड (रा. कोरेगाव, ता. जि. लातूर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार 4 ऑगस्ट 2018 ते 17 जानेवारी 2021 या कालावधीत आंबेजोगाई तालुक्यातील चनई गावी घडला. विवाहिता तिच्या सासरी नांदत असताना आरोपींनी नवीन रिक्षा घेण्यासाठी वडिलांकडून एक लाख रुपये घेऊन ये अशी मागणी केली. त्यावरून विवाहितेचा जाच केला.

विवाहिता काही दिवस माहेरी गेली आणि परत आली असता आरोपींनी पुन्हा तिच्याकडे पैशांसाठी तगादा लावला. ‘पैसे आणल्याशिवाय तू घरात यायचे नाही. तू घरातून निघून जा, नाहीतर तुला गॅलरीतून खाली फेकून देईन’ अशी धमकी देत विवाहितेचा छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.